Join us  

कोरोनाच्या भीतीने अजूनही नागरिक चाचणी टाळतात, तज्ज्ञांचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 6:46 AM

सामान्यांनी कोरोनाची लक्षणे दिसताच चाचणी केली पाहिजे. कारण सामाजिक दडपणामुळे सामान्य नागरिक पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे, असे राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्यापासून कोरोना आजाराविषयी सामान्यांच्या मनात भीती आहे. परिणामी, आजही या भीतीमुळे अनेक सामान्य नागरिक कोरोना चाचणी करण्यास पुढे येत नाहीत. ही भीती दूर सारून चाचण्यांकरिता अधिकाधिक नागरिकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी सांगितले.सामान्यांनी कोरोनाची लक्षणे दिसताच चाचणी केली पाहिजे. कारण सामाजिक दडपणामुळे सामान्य नागरिक पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे, असे राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन चाचणी करणे, निदान करणे आणि त्यांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेणे हे सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर केले पाहिजे.सध्या दिवसाला १५ हजार चाचण्या करण्यात येत आहेत. दुसरीकडे दिल्लीमध्ये दिवसभरात सुमारे ६२ हजार चाचण्या करण्यात येत आहेत. मुंबईत करण्यात येणाºया चाचण्यांद्वारे दिवसाला दोन हजारांच्या जवळपास रुग्ण निदान होत आहे, तर दिल्लीत हे प्रमाण चार हजारांच्या घरात आहे.मुंबईत रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १८ टक्के असून, दिल्लीत ते ६ ते ७ टक्क्यांच्या घरात आहे.दिवसभरात १५ हजार चाचण्यापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, सामान्य नागरिक चाचणीसाठी पुढे येत नाहीत, कोणालाही चाचणीसाठी बळजबरी करता येत नाही. त्याचप्रमाणे, शहर-उपनगरातील कोणत्याही परिसरात सरसकट कोरोना चाचण्या घेता येत नाहीत. त्यामुळे चाचण्यांचे उपलब्ध किट्स वाया जाण्याची भीती असते. दिवसभरात १५ हजार चाचण्या होतात. त्यातील ६० टक्के चाचण्या अँटिजन आहेत, तर ४० टक्के या आरटीपीसीआर चाचण्या आहेत. कोरोनाची स्थिती नियंत्रणात येण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. जम्बो कोविड केंद्रासह पालिकेच्या रुग्णालयातही खाटा वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस