Join us

सिटीजन.....

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST


सिटीजन.....

पोस्ट कार्यालयात तिकिटांचा तुटवडा

पोस्ट कार्यालय हे सर्व सामान्यांचे कौटंुबिक जिव्हाळा निर्माण करण्याचे आश्रयस्थान. पोस्ट कार्यालयाद्वारे करण्यात येणार्‍या टपालसेवेमुळे सर्वसामान्यंाना गावाकडील आपल्या कुटुंबियांची खुशाली समजते. परंतु आज पोस्ट कार्यालयात पोस्ट तिकिटांचा तुटवड्यामुळे नागरिकांना पत्रप्रपंच करणे अवघड जात आहे. अशातच काही स्वयंसेवी संस्था जनमानसात समाजसेवा रुजावी म्हणून मासिक, पाक्षिक अंक काढून जनसेवा करतात. त्यासाठी पोस्ट कार्यालय नाममात्र म्हणजे २५ पैशांचे तिकिट लावण्याची सुविधा पुरविते. परंतु आता २५ पैशांच्या तिकिटांच्या तुटवड्यामुळे संस्थांना सभासदांसाठी असलेले अंक पाठवतांना अडचणी निर्माण होत आहे. परिणामी छापलेले अंक पाठवता न आल्याने त्याचे नुकसान स्वयंसेवी संस्थांना करावे लागत आहे. अशासमयी खाजगी कुरियरद्वारा टपाल पाठविले तर नाहक अधिक रकमेचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. महागाईच्या वणव्यात होरपळणार्‍या नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोस्ट कार्यालयाने २५, ५० पैशांचे तिकीट तसेच १, ५ रुपये असलेल्या तिकिटांचा पुरवठा सुरळीत करण्याची कार्यक्षमता दाखवली तर अधिकाधिक नागरिक पोस्टसेवेचा लाभ घेऊ शकतील. शिवाय पोस्ट कार्यालयाच्या महसूलातही वाढ होईल.

शिवदास शिरोडकर, लालबाग