नवी मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून शहरात सर्वत्र रूटमार्च काढण्यात येत आहे. प्रत्येक विभागातून शिस्तबद्ध संचलन सुरू आहे. विधानसभा निवडणूक शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काळ्या पैशांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नाकाबंदी वाढविण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी पूर्ण शहरात रूट मार्च सुरू केले आहे. सशस्त्र पोलीस, राज्य राखीव दलाच्या तुकडीचा यामध्ये समावेश असतो. पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.
शहरात पोलिसांचे संचलन
By admin | Updated: October 9, 2014 03:02 IST