Join us
Daily Top 2Weekly Top 5

मसोली महावितरण कार्यालयाला घेराव

By admin | Updated: October 18, 2014 21:58 IST

येथील गेल्या अनेक वर्षापासून गंजलेले लोखंडी खांब, कमकुवत ट्रान्सफॉर्मर, तसेच जीर्ण व जुनाट झालेल्या वीजेच्या तारांमुळे अनेक वेळा अपघात होत आहेत.

डहाणू : येथील गेल्या अनेक वर्षापासून गंजलेले लोखंडी खांब, कमकुवत ट्रान्सफॉर्मर, तसेच जीर्ण व जुनाट झालेल्या वीजेच्या तारांमुळे अनेक वेळा अपघात होत आहेत. वारंवार मागणी करूनही महावितरण कंपनीकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने  संतप्त महिला, स्थानिक नगरसेवकांनी डहाणूतील वीज महावितरण कार्यालयाला शनिवारी घेराव घालून उपकार्यकारी अभियंताला जाब विचारला.
डहाणू गावच्या टागोर लेन येथे गेल्या चाळीस वर्षापासून टाकलेले लोखंडी खांब पूर्णपणो गंजल्याने तसेच त्याच्यावर असलेली विद्युत वाहिनी जीर्ण व जुनाट झाल्याने येथे दिवसरात्र वीजेच्या तारा तुटण्याच्या प्रकारात लक्षणीय वाढ झाली आहे. शिवाय एका घराच्या भिंतीला लागूनच वीजेच्या तारा खेचण्यात आल्याने येथे अनेक वेळा आग लागली आहे. या घरात राहणा:या कुटुंबाला जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे.  काही दिवसांपुर्वी या भागातील दोन वीज वाहिन्या तुटून जमिनीवर पडल्या. याबाबत तक्रार करूनही सकाळी साडेसहा वाजेर्पयत कोणताही कर्मचारी आला नाही. सुर्दैवाने नागरीकांनी सकाळर्पयत येणा:या, जाणा:या लोकांना सावधान केल्याने पुढील अनर्थ टळला.दरम्यान डहाणू गावातील वीजेचे खांब, वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, कंडक्टर तसेच इतर साहित्य त्वरीत बदलण्यात यावे या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांनी मसोली येथील वीज महावितरण कार्यालयाला घेराव घालून या परिसरातील वीजेची समस्याचा पाढा वाचला. यावेळी उपकार्यकारी अभियंता देवकर यांनी नगरसेवक शमी पीरा यांच्याशी सविस्तर चर्चा करून ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस या भागातील सर्व साहित्य बदलण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)