Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिने अभिनेत्रीच्या बॉडीगार्डविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:07 IST

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप,डी. एन. नगर पोलिसांकड़ून तपास सुरूसिने अभिनेत्रीच्या बॉडीगार्डविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखललग्नाचे ...

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप,

डी. एन. नगर पोलिसांकड़ून तपास सुरू

सिने अभिनेत्रीच्या बॉडीगार्डविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप,

डी. एन. नगर पोलिसांकडून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपावरून नेहमीच चर्चेत असलेल्या सिने अभिनेत्रीच्या बॉडीगार्डविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार हेगडे (३३) असे त्याचे नाव असून, डी. एन. नगर पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

तक्रारदार तरुणी अंधेरी परिसरात राहण्यास असून ब्युटीशियन आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आठ वर्षांपूर्वी तिची हेगडे सोबत ओळख झाली. अशात, बॉलिवूडमध्ये पर्सनल बॉडीगार्ड म्हणून काम करतो. गेल्या वर्षी जून महिन्यात त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले, ते दोघेही एकाच क्षेत्रात काम करत होते. दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. आपण लवकरच लग्न करणार असल्याचे सांगून त्याने तिच्यावर अनेकदा नैसगिक आणि अनैसगिक लैगिंक अत्याचार

करत होता. पुढे त्याने, टाळाटाळ सुरू केली. २७ एप्रिल २०२१ रोजी आईचे निधन झाल्याचे सांगून तिच्याकडून ५० हजार रुपये घेत तो नॉट रिचेबल झाला. दरम्यान त्याच्या एका मित्राने कुमार सध्या जेलमध्ये असल्याचे सांगितले, त्यानंतर काही वेळाने तिला अन्य एका महिलेचा फोन आला, तिने ती कुमारची आई असल्याचे सांगून ते दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने ती त्याचे लग्न दुसऱ्या तरुणीसोबत करून देणार असल्याचे सांगितल्यामुळे तरुणीला मानसिक धक्का बसला.

यात आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तरुणीने बुधवारी डी. एन. नगर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

....