अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीपावसाळ्यापूर्वी प्रशासनाकडून धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. मात्र त्यातही दुजाभाव झाल्याची भावना कळंबोलीकर व्यक्त करीत आहेत. येथील केएल टाईपची जवळपास सर्व घरे मोडकळीस आली आहेत. मात्र प्रशासनाकडून केवळ ठरावीक घरांना धोकादायक ठरवून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. २0१३साली दोनही टाईपच्या इमारतींची संरचनात्मक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये जवळपास सर्व इमारती धोकादायक असताना सिडकोने केवळ ९५ सदनिका धोकादायक असल्याचे जाहीर केले. त्या सदनिकाधारकांना गेल्या वर्षी नोटिसा बजावून त्या खाली करण्याचे सूचित करण्यात आले. संरचनात्मक अहवालानुसार, काही इमारतीमधील पहिल्या माळ्यावरील सदनिका धोकादायक ठरवण्यात आल्या आहेत, मात्र तळमजल्यावरील सदनिकांना नोटिसा देण्यात आल्या नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. सिडकोने येथील रहिवाशांची उलवेतील उन्नती गृहनिर्माण प्रकल्पात तात्पुरती व्यवस्था केली आहे. तीस वर्षांपूर्वी सिडकोने कळंबोलीत इमारती उभारल्या त्याचबरोबर बैठी घरेही बांधली. मुंबईपेक्षा कमी किमतीत घरे मिळत असल्याने अनेकांनी ही घरे विकत घेतली. मात्र काही वर्षांतच पावसाळ्यात पाणी झिरपणे, भिंतींना तडे जाणे, मलनि:सारण वाहिन्या तुंबणे, भिंतीचे प्लॅस्टर निघणे आदी समस्यांनी येथील रहिवासी त्रस्त झाले. १९९० पासून रहिवाशांनी सिडकोकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार काही घरांची जुजबी दुरुस्ती सिडकोने केली, मात्र सध्या या घरांची दुरवस्था झाली आहे.कळंबोलीत एलआयजी, केएल-२,४,५,६, ए टाईप ही सिडकोची घरे आहेत. पैकी केएल - २, केएल -४ मधील रहिवासी जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. मोडकळीस आलेली घरे जमीनदोस्त करून त्या जागी नवीन इमारती बांधण्यासाठी श्री गणेश ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष आत्माराम पाटील १९९२ पासून सिडको आणि शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्या संदर्भात शासनाने चार वेळा जीआर काढला असून हरकती आणि सूचनाही मागितल्या आहेत. मात्र त्यापुढे काहीही हालचाली झालेल्या नाहीत.स्थलांतर न परवडणारे-धोकादायक इमारतीतील बहुतांश रहिवासी अल्प उत्पन्न गटातील आहेत. त्यांची मुले परिसरातील शाळा-महाविद्यालयांत शिकत आहेत. सिडकोने या रहिवाशांची राहण्याची व्यवस्था उलवेतील उन्नती गृहनिर्माण प्रकल्पात केली असली तरी रहिवाशांना आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नाही. उलवे ते कळंबोली वाहतुकीसाठी कोणतीही सुविधा नाही. शिवाय दैनंदिन खाजगी वाहतूक रहिवाशांना परवडणारी नाही. कळंबोली सेक्टर-५ व ६ ई येथील सिडकोच्या सर्व इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्या सर्व इमारती व घरांना धोकादायक घोषित करावे. त्याचबरोबर इमारतींमधील सदनिकाधारकांना प्रति महिना पाच हजार भाडे देण्यात यावे.- आत्माराम पाटील, अध्यक्ष, ओनर्स असोसिएशनमोडकळीस आलेल्या घरांना यंदाही नोटिसा दिल्या आहेत. येथील रहिवाशांची सोय उलवे येथे केली आहे. हे ठिकाण वाहतुकीस गैरसोयीचे असल्याने सदनिकाधारक येथे जाण्यास तयार नाहीत. रहिवाशांची ही तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली आहे. - आर.एन. बडवे, वसाहत अधिकारी, सिडको
सिडकोचा यादीत दुजाभाव
By admin | Updated: June 15, 2015 22:47 IST
पावसाळ्यापूर्वी प्रशासनाकडून धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. मात्र त्यातही दुजाभाव झाल्याची भावना कळंबोलीकर व्यक्त करीत आहेत.
सिडकोचा यादीत दुजाभाव
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}