नवी मुंबई : गोठीवली येथील दोन अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारी सिडकोने कारवाई केली. इमारतीच्या सुरु असलेल्या बांधकामांवर, रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या बेकरीवर ही कारवाई करण्यात आली.गोठीवली गाव येथील तलावालगतच्या सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर इमारती उभारणीचे काम सुरु होते. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या या बांधकामादरम्यान तेथे एक मजल्यापर्यंतचे इमारतीचे काम झालेले होते. परंतु सिडकोच्या भूखंडावर सुरु असलेल्या या बांधकामाची कसलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम सिडकोने शुक्रवारी पाडले. सिडकोकडून पोलीस बंदोबस्तात बांधकामांवर कारवाई करण्यात आली. याच भूखंडालगतच असलेली बेकरी देखील हटवण्यात आली. सिडकोच्या सदर मोकळ्या भूखंडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच ही बेकरी बांधण्यात आली होती. त्यावर देखील कारवाई करुन हा भूखंड मोकळा करण्यात आला. या धडक कारवाईने परिसरातील भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)
गोठीवलीत सिडकोचा हातोडा
By admin | Updated: December 27, 2014 00:51 IST