Join us

ािस्ती समाजात ख्रिसमसची तयारी जय्यत सुरू

By admin | Updated: December 8, 2014 23:38 IST

नाताळ अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी ख्रिस्ती समाजातील रहिवाशांची धावपळ सुरू झाली आहे.

वसई : नाताळ अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी ख्रिस्ती समाजातील रहिवाशांची धावपळ सुरू झाली आहे. आतापासूनच ख्रिस्ती नागरिकांची खरेदीला सुरुवात झाली आहे. 24 तारखेला रात्री 12 वा. सर्व चर्चेसमध्ये सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर नाताळ सणाला सुरुवात होईल. दरवर्षी वसईतील सर्व चर्चेसवर नाताळनिमित्ताने रोषणाई करण्यात येत असते. यंदाही अशी रोषणाई करण्यात येणार आहे.
वसई तालुक्याच्या पश्चिम परिसरात ख्रिस्ती समाज मोठय़ा संख्येने राहतो. पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या अनेक गावांमध्ये त्यांचे मोठय़ा प्रमाणात वास्तव्य आहे. त्यांच्या विविध सणांपैकी नाताळ हा सण प्रमुख सण असून तो मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. नाताळनिमित्त घराघरांत गोड पदार्थ बनविण्यात येतात तर अनेक ख्रिस्ती बांधव आपल्या अंगणामध्ये नाताळ गोठा निर्माण करून येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा उभारतात. मध्यरात्री चर्चमध्ये प्रार्थना झाल्यानंतर ख्रिस्ती बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात व नाताळ सण साजरा करतात. गावातील तलावातही चलचित्रद्वारे भव्यदिव्य देखावे उभारण्यात येत असतात. रात्री होणा:या या कार्यक्रमास पंचक्रोशीतील ख्रिस्ती समाज व अन्य धर्मीय नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी होत असतात. गेली अनेक वष्रे नाताळ सण उत्साहात साजरा केला जातो. ग्रामीण भागामध्ये 25 ते 31 डिसें.दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. (प्रतिनिधी)