Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाताळ सणाला उत्साहात प्रारंभ

By admin | Updated: December 26, 2016 02:16 IST

मनमाड : प्रार्थना व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

 मनमाड: शहरात नाताळाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शनिवारी मध्यरात्री शहरातील सर्व चर्चमध्ये ख्रिस्तजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.विविध चर्चमध्ये आर्कषक रोषणाई व सजावट करण्यात आली होती. मध्यरात्री संत बार्णबा चर्च बेथेल चर्च ,सेव्हथ -डे अ‍ॅडव्होटिस्ट चर्च आदी विविध चर्चमध्ये नाताळ निमित्त प्रार्थना व धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास फटाक्यांच्या आतषबाजीने शहर दणाणून गेले .परिसरात ख्रिश्चन बांधव आबाल वृध्द माहिला मोठया संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते. चर्चमध्ये नाताळ संदेश भक्ती उपासना ,बार्णबा चर्चमध्ये संत बार्णबा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच कॅम्प येथे स्टार उभारण्यात आला आहे. नाताळ व नवर्षीनिमित्त पुर्व संध्या बप्तीसे, निराधार विधवांना साडी वाटप, संदेश भक्ती, पवित्र सहभागीता, वृक्षारोपण कँडल सर्विस आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी रेव्ह. आर.पी. घुले, अशोक पाटोळे,शमुवेल कुबेरजी,अतुल सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थिीतीत पवित्र सहभागिता करण्यात आली. डेव्हीड नगालीकर, अविनाश सुर्यवंशी, आंनद अस्वले,एबीनेजर कुबेरजी, माणीक जाधव, सतिष सुर्यवंशी, प्रशांत केदारी,रोझी कुलकर्णी,डॅनियल शेलार,अमोल काळे,मोनिका कुबेरजी, अरूण मोहन,स्मिता खडांगळे यांच्यासह चर्च कमीटी सदस्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. (वार्ताहर)