Join us

जिल्ह्यातील चो:या वाढल्या

By admin | Updated: November 27, 2014 22:27 IST

जिल्हाभरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून घरफोडय़ा, चो:या आणि विशेषत: सोन्याच्या दागिन्यांच्या चो:यांमध्ये वाढ झाली आहे.

जयंत धुळप ल्ल अलिबाग
जिल्हाभरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून घरफोडय़ा, चो:या आणि विशेषत: सोन्याच्या दागिन्यांच्या चो:यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी एकूण 11 घरफोडय़ा झाल्या असून त्यामध्ये 1क् लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला आहे.
पेण तालुक्यातील रामवाडी गावांत समर्थनगरमधील साईगंगा बिल्डिंगमध्ये इंद्राणी सुजय प्रसाद यांच्या घराच्या दरवाजाचे लॅच व कडीकोयंडा तोडून मंगळवारी भरदिवसा चोरटय़ांनी केलेल्या घरफोडीत सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 5 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. 
रोहा तालुक्यातील गेल्या 21 नोव्हेंबरला  भुवनेश्वर येथील विनोद विलास मोहिते यांच्या घराचे कडीकोयंडे रात्रीच्यावेळी तोडून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. याप्रकरणी रोहा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
खालापूर तालुक्यातील साजगांव येथील सुभाष मिल कंपाऊंडमधील कॉपर केबल, डाय बॅटरीज असा एकूण 44 हजार 6क्क् रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी 14 नोव्हेंबरला लंपास केला. या प्रकरणी सचिन नामदेव काळे यांनी खोपोली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावातील प्रभांगी प्रभाकर पाटील यांच्या घरात शिरुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 27 हजार 4क्क् रुपयांचा ऐवज चोरटय़ाने लंपास केला आहे. गेल्या 18 नोव्हेंबरला झालेल्या या चोरी प्रकरणी प्रभांगी पाटील यांनी दिघी सागरी पोलिसांकडे दिले आहे. 
पोलादपूर शहरातील सिद्धेश्वर आळी परिसरात सैनिकनगरमध्ये राहणारे राजन बन्सीधर पाटणकर यांच्या घरी शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीत चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 6 हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला आहे.
कजर्त तालुक्यातील नेरळजवळच्या पाषाण ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयातील संगणक, प्रिंटर, लॅपटॉप असा एकूण 35 हजार रुपये किमतीचा ऐवज गेल्या 2क् नोव्हेंबर रोजी चोरटय़ांनी लंपास केला. याप्रकरणी सरपंच गीता महेंद्र विशे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. माणगांवमधील बालाजी कॉम्प्लेक्समध्ये राहणारे अशोक वामन दळवी यांच्या घरातील 1 लाख 5 हजाराचे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी लंपास केल्या प्रकरणी माणगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
याच तालुक्यातील खर्डी बुद्रुक गावातील हिरवाई बायोटेक फार्म हाऊसमधून आठ हजारांची तांब्याची तार चोरटय़ांनी लंपास केली.
 
4रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात घडणा:या छोटय़ा-मोठय़ा सर्व गुन्ह्याची नोंद घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी गुन्हय़ांचे प्रमाण अधिक दिसते. परंतु प्रत्यक्षात गुन्हे उकल व तपासात गतवर्षीच्या तुलनेत 38 टक्क्याने वाढ झाली आहे. 
4तर ऐवज पुनप्र्राप्ती प्रमाणात देखील 25 टक्क्याने वाढ झाली असल्याची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 
गतवर्षी एकूण चो:यांचे गुन्हे 41क् होते त्या आता 9क् ने कमी होवून 32क् वर आले असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. घरफोडय़ांबरोबरच चोरांनी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयातही चोरी केल्याचे उघड झाले आहे.