Join us
Daily Top 2Weekly Top 5

बच्चे कंपनीची चंगळ बालदिनानिमित्त चॉकलेट, आईस्क्रीम आणि गिफ्ट्स

By admin | Updated: November 15, 2016 05:11 IST

पंडीत जवाहरलाल नेहरू अर्थात चाचा नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या होणाऱ्या बालदिनाला यंदा गुरु नानक जयंतीच्या सार्वजनिक सुटीची

मुंबई: पंडीत जवाहरलाल नेहरू अर्थात चाचा नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या होणाऱ्या बालदिनाला यंदा गुरु नानक जयंतीच्या सार्वजनिक सुटीची भेट मिळाली. त्यामुळे शाळांसह कार्यालयांना सुटी असल्याने बच्चे कंपनीने पालकांसोबत धमाल केली. चॉकलेट, आईस्क्रीम आणि वेगवेगळ््या गिफ्ट्समुळे बालदिनी बच्चे कंपनीची चंगळ झाली.देशात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याने बहुतेक पालक रविवारीही विविध बँकांबाहेर रांगेत उभे होते. संडेला गमावलेली मजा बहुतेक पालकांनी बालदिनाच्या माध्यमातून मंडेला पूरेपूर वसूल केली. त्यामुळेच गेल्या पाच दिवसांपासून ओस पडलेल्या मॉलमधील प्ले एरियामध्ये सोमवारी विशेष गर्दी दिसली. याशिवाय चॉकलेट, आईस्क्रीम पार्लरचाही चिमुरड्यांनी ताबा घेतला होता. उपनगरातील काही मॉलमध्येही मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात पालकांनीही मजा लुटली. आपल्या दराऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई पोलिसांनीही बालदिन साजरा केला. मुलांना आईस्क्रीम वाटत पोलिसांनी बच्चे कंपनीसोबत बालदिनाची मजा लुटली. याउलट दादरच्या हेअरक्राफ्ट सलूनमध्ये मोफत हेअर कटींग सेशन ठेवण्यात आले होते. यावेळी स्पाईक, प्रिसेंस कट या आवडीच्या हेअरस्टाईल करुन लहानगने भाव खाऊन गेले.