Join us

मॉडेल बलात्कारप्रकरणी चिराग गुप्ताला अटक

By admin | Updated: May 15, 2016 04:45 IST

एका मॉडेलवर बलात्कार करणाऱ्या चिराग गुप्ता याला अखेर कुरार पोलिसांनी अटक केली आहे. कुर्ला परिसरातूनच बुधवारी त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

मुंबई : एका मॉडेलवर बलात्कार करणाऱ्या चिराग गुप्ता याला अखेर कुरार पोलिसांनी अटक केली आहे. कुर्ला परिसरातूनच बुधवारी त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे.गुप्ता याने २ मे रोजी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर गुप्ता फरार झाला. कुरार पोलीस त्याचा शोध घेत होते. मध्य प्रदेशमध्ये तो लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक त्याच्या मागावर होते. मात्र मध्य प्रदेशमधूनही तो निसटला. अखेर तो कुर्ला परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि सापळा रचून पोलिसांनी गुप्ताच्या मुसक्या आवळल्या. चिराग गुप्ता याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक आणि तपास अधिकारी सज्जन लांडगे यांनी ‘लोकमत’ला दिली. २३ एप्रिल रोजी पीडित मॉडेलने गुप्ताविरोधात कुरार पोलिसांकडे तक्रार केली होती. विवाहित असूनही अविवाहित असल्याचे सांगत विवाहाचे आमिष दाखवून त्याने बलात्कार केल्याचा आरोप मॉडेलने केला आहे. (प्रतिनिधी)