Join us
Daily Top 2Weekly Top 5

चिंतन उपाध्यायचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: November 18, 2016 07:24 IST

पत्नी व तिचा वकील, अशा दुहेरी हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या आर्टिस्ट चिंतन उपाध्यायची जामिनावर सुटका करण्यास दिंडोशी सत्र न्यायालयाने नकार दिला.

मुंबई : पत्नी व तिचा वकील, अशा दुहेरी हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या आर्टिस्ट चिंतन उपाध्यायची जामिनावर सुटका करण्यास दिंडोशी सत्र न्यायालयाने नकार दिला. आतापर्यंत दुसऱ्यांदा चिंतन उपाध्यायचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. चिंतन उपाध्यायच्या जामीन अर्जावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. २५ आॅक्टोबर रोजी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून, न्यायालयाने चिंतनच्या जामिनावरील निकाल राखून ठेवला होता. सरकारी वकिलांनी चिंतनच्या जामीन अर्जावर आक्षेप घेताना म्हटले की, चिंतनच्या प्रेमप्रकरणामूळे होणाऱ्या वादानेच चिंतनने हेमा अािण अ‍ॅड. भंबानी यांची हत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चिंतनच्या दिल्लीतील घरातून काही स्केच जप्त करण्यात आले. मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर, त्यांच्या घरातून दोन मोठे बॉक्सही जप्त करण्यात आले. हे बॉक्स दोघांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ठेवण्यात आले होते. (प्रतिनिधी)