Join us  

मेगालॅबच्या उभारणीत चायनिज तंत्रज्ञान होणार हद्दपार; स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 2:26 AM

आयआयटी अल्युमनाय कौन्सिल प्रकल्पांच्या संशोधनाविषयी आणि सार्वजनिक धोरणाविषयीची माहितीही ब्लॉकचेन तंत्रज्ञानामार्फत केवळ अधिकृत वापरकर्त्यांपर्यंतच पोहोचविली जाणार असल्याचे आयआयटी अल्युमनाय कौन्सिलने स्पष्ट केले

मुंबई : कोविड-१९ आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून संक्रमित झालेल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी मेगालॅब मुंबई ही जगातील एकमेव चाचणी सुविधा म्हणून नावारूपाला येत आहे. मात्र आता या मेगालॅबच्या उभारणीत कोणत्याही प्रकारच्या चायनिज तंत्रज्ञान किंवा अ‍ॅप्लिकेश, सॉफ्टवेअरचा समावेश करण्यात येणार नाही.

चायनिज अ‍ॅप्सवर टाकण्यात आलेल्या बंदीनंतर आयआयटी अल्युमनाय कौन्सिलने आपल्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये चायनिज सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर न करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मुंबई विद्यापीठासह उभारण्यात येणाऱ्या मेगालॅब प्रोजेक्टचाही समावेश आहे.सुरक्षितता, गोपनीयता आणि माहिती संकलनासाठी यापुढे आयआयटी अल्युमनाय कौन्सिल ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

आयआयटी अल्युमनाय कौन्सिल प्रकल्पांच्या संशोधनाविषयी आणि सार्वजनिक धोरणाविषयीची माहितीही ब्लॉकचेन तंत्रज्ञानामार्फत केवळ अधिकृत वापरकर्त्यांपर्यंतच पोहोचविली जाणार असल्याचे आयआयटी अल्युमनाय कौन्सिलने स्पष्ट केले. प्रकल्पामध्ये आतापर्यंत वापरलेले सर्व प्रकारचे चायनिज तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर हे लवकरच स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रिप्लेस केले जाणार असल्याची माहिती आयआयटी अल्युमनाय कौन्सिलतर्फे देण्यात आली आहे.

कोविड-१९ च्या दरम्यान वापरात आलेल्या प्लास्टिक सॅम्पल ट्यूब्स, प्लेट्स आणि पर्यावरणाला हानिकारक ठरणाºया इतर जैव कचºयाचा पुनर्वापर (रिसायकलिंग) करण्याचा आयआयटी रुरकीसोबतचा प्रकल्प, दर महिन्याला १ कोटीहून अधिक चाचण्या करणाºया मुंबई विद्यापीठासोबत उभारण्यात येणाºया मेगालॅबची उभारणी, मेगालॅबमध्ये वापरण्यात येणारे स्वदेशी आयआरपीटीसी टेस्ट किट्सची निर्मिती अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमधून चायनिज तंत्रज्ञान हटविण्याचा निर्णय आयआयटी अल्युमनाय कौन्सिलने घेतला आहे.मुंबई विद्यापीठ, आयसीटी मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान संस्थांसोबत या प्रकल्पासाठी जागतिक दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर आपण तयार करू शकू, असा विश्वास आयआयटी अल्युमनाय कौन्सिलचे अध्यक्ष रवी शर्मा यांनी व्यक्त केला.बंदीचा निर्णय योग्यचचायनीज तंत्रज्ञानावर आधारित एप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर यांमध्ये सायबर धोका जास्त असून ते आपल्या माहितीसाठी सुरक्षितता, गोपनीयता आणि माहिती संकलनाच्या दृष्टीने मारक ठरू शकतात. त्यामुळे चायनीज अ‍ॅप्लिकेशन्सवरील बंदीचा निर्णय हा योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे असेच म्हणावे लागेल. सुरक्षितता, गोपनीयता आणि माहिती संकलनाच्या पार्श्वभूमीवरच स्वदेशी तंत्रज्ञान वापरून उत्तमोत्तम सुविधांची निर्मिती कशी करता येईल याचा विचार करायला हवा असे मत आयआयटी अल्युमनाय कौन्सिलच्या डेटा सिक्युरिटी वर्किंग ग्रुपचे इन्व्हेस्टिगेटिंग अधिकारी आयपीएस संजय सहाय यांनी व्यक्त केले.

टॅग्स :चीन