Join us

घरात नैसर्गिक विधी केल्याच्या रागात चिमुरडीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:06 IST

सावत्र वडिलांना बेडया, साकीनाका येथील घटनाघरात नैसर्गिक विधी केल्याच्या रागात चिमुरडीची हत्यासावत्र वडिलांना अटक; साकीनाका येथील घटना...

सावत्र वडिलांना बेडया, साकीनाका येथील घटना

घरात नैसर्गिक विधी केल्याच्या रागात चिमुरडीची हत्या

सावत्र वडिलांना अटक; साकीनाका येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घरात खेळताना नैसर्गिक विधी केल्याच्या रागात, सावत्र वडिलांनी मुलीच्या कानशिलात लगावली. यातच, मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना साकीनाका परिसरात घडली. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी सावत्र वडील आरिफ शेख ऊर्फ जशिम अक्रम अन्सारीला (२८) अटक केली.

साकीनाका येथील नेताजीनगर परिसरात दोन वर्षांची शिफा आई रजिया (२८) आणि सावत्र वडील आरिफसोबत राहण्यास होती. गेल्या आठवड्यात ही घटना घडली. सकाळी साडेआठच्या सुमारास शिफाने घरात खेळताना जुलाब केले. याचा राग आल्याने आरिफने तिच्या कानाखाली मारले. मारहाणीत ती बेशुद्ध झाली. तिला जवळच्या रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. तपासात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी आईकडे चौकशी केली. तेव्हा वरील घटनाक्रम समोर आला. त्यानुसार पोलिसांनी रजियाच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदवत आरिफला अटक केली असून अधिक तपास सुरू केला.

..........................