Join us
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरड्याचा मारेकरी बापच

By admin | Updated: March 12, 2015 01:14 IST

ट्रॉम्बेच्या चिता कॅम्पमधून बेपत्ता झालेल्या दीड वर्षाच्या चिमुरड्याची हत्या त्याच्याच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या बापाने केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मनीषा म्हात्रे, मुंबईट्रॉम्बेच्या चिता कॅम्पमधून बेपत्ता झालेल्या दीड वर्षाच्या चिमुरड्याची हत्या त्याच्याच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या बापाने केल्याचे स्पष्ट झाले आहे. आज ट्रॉम्बे पोलिसांनी त्याला अटक केली. हे मूल आपले नाही हा संशय, भाडेकरूंना या गुन्ह्यात गुंतवून घर खाली करून घेण्यासाठी त्याने आपल्याच मुलाचा जीव घेतला, अशी धक्कादायक माहिती ट्रॉम्बे पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.शम परवेझ आलम (३९) असे आरोपी बापाचे नाव आहे. आलमचा दीड वर्षाचा मुलगा अब्दुल्ला ६ मार्चच्या पहाटे चिता कॅम्पमधील खाडीलगतच्या राहत्या झोपडीतून गायब झाला. तीन दिवसांनी चिमुरड्या अब्दुल्लाचा मृतदेह महाराष्ट्र नगर परिसरातल्या नाल्यात सापडला. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला होता. मात्र अब्दुल्ला बेपत्ता झाला त्या दिवसापासूनच ट्रॉम्बे पोलिसांना आलमवर संशय होता.तपासाच्या सुरुवातीलाच आलमच्या मुलाच्या जबाबातून संशयाची सुई त्याच्यावर रोखली गेली. घटनेच्या रात्री मी सवयीप्रमाणे तीन वाजता उठलो. तेव्हा बापही जागेवर नव्हता आणि बाबूही (अब्दुल्ला), अशी माहिती या मुलाने पोलिसांना दिली. त्यानंतर पहाटे सहाच्या सुमारास आलम आपल्या झोपडीबाहेर निवांत उभा असलेला अनेकांनी पाहिला. जेव्हा परिसरातली वर्दळ वाढली तेव्हा त्याने मूल हरविल्याची बोंब ठोकली. पोलीस ठाण्यात तक्रार देताना त्याने मध्यरात्री ही घटना घडल्याचा संशय व्ंयक्त केला. मध्यरात्री घटना घडली, समजली आणि त्यानंतर शोधाशोध सुरू केली हे सांगणारा आलम पहाटे सहाच्या सुमारास आपल्या झोपडीबाहेर निवांत उभा कसा, हाही प्रश्न पोलिसांना सतावत होता. त्यापुढे पोलीस ठाण्यात तक्रार देण्याआधी पत्नीने आलमवरच संशय व्यक्त केला होता. मुलाच्या आठवणीने आक्रोश करणाऱ्या पत्नीने चारचौघात तूच माझ्या मुलाला विकले आहेस, असा आरोप केला होता.या पार्श्वभूमीवर पोलीस आलमची माहिती काढत होते. त्याच्या मोबाइल रेकॉर्डवरून घटनेच्या मध्यरात्री तो खाडीजवळ गेला होता हे स्पष्ट झाले. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून आलमने रात्री बाराच्या सुमारास मोबाइल बंद केला. त्यात गावचे सिमकार्ड भरले. मात्र मोबाइलच्या ईएमईआयवरून त्याचे लोकेशन पोलिसांना मिळाले. सर्वच पुरावे विरोधात गेल्याने अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.