मुंबई : फुटपाथवर आईसोबत झोपलेल्या दोन महिन्यांच्या चिमुरड्याचे अपहरण झाल्याची घटना सोमवारी पहाटे पायधुनी येथे घडली. याबाबत पायधुनी पोलिसांनी अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला.गेल्या अनेक वर्षांपासून पायधुनी परिसरातील नागदेवी रोडलगत असलेल्या फुटपाथवर एक दाम्पत्य मुलासह राहत होते. रविवारी सायंकाळी मुलाचे आई-वडील आणि मुलगा याच ठिकाणी झोपले होते. मात्र सोमवारी पहाटेच्या सुमारास दोघेही गाढ झोपेत असताना अज्ञात इसमांनी या मुलाला पळवून नेले. सकाळी पालकांनी पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी येथील एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काल रात्रीपासून एक महिला आणि एक पुरुष फिरत असल्याचे चित्रण आहे. यामध्ये ही महिला लंगडत असल्याचे दिसत आहे. त्यानुसार दोघांचे छायाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे.
पायधुनी येथे चिमुरड्याचे अपहरण
By admin | Updated: January 6, 2015 01:31 IST