Join us
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीवर बलात्कार

By admin | Updated: January 5, 2017 06:34 IST

चिमुरड्या बहिणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी कांदिवलीत घडला. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी तिच्या सतरा वर्षीय भावाला अटक केली आहे

मुंबई : चिमुरड्या बहिणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी कांदिवलीत घडला. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी तिच्या सतरा वर्षीय भावाला अटक केली आहे. कांदिवली पूर्वेकडील बिहारी टेकडी परिसरात हा प्रकार घडला.सात वर्षीय मुलगी आई-वडील, काका-काकी, तीन भाऊ आणि आजी-आजोबांसह वन प्लस वन घरात राहते. पीडित मुलगी तिच्या अन्य चार बहिणींसोबत घराच्या माळ्यावर आजी-आजोबांसोबत झोपण्यास जात होती. मात्र महिनाभरापूर्वी हे दोघे त्यांच्या नातेवाइकांकडे राहण्यास गेले. त्यामुळे या पाच बहिणींना सोबत म्हणून झोपण्यासाठी त्याच्या आईने जावेच्या मुलाला पाठविले. मात्र सात वर्षांच्या बहिणीवर त्याने अत्याचार केले. हा आरोपी मंदिरात पूजाविधीचे काम करत असल्याने याबाबत वाच्यता केल्यास तुझ्यावर ‘जादूटोणा’ करेन असे त्याने धमकाविले. त्यामुळे घाबरून तिने कोणाला काहीच सांगितले नाही. त्यामुळे महिनाभर तिच्यावर हा अत्याचार सुरू होता.दरम्यान, यामुळे तिची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. ही बाब तिच्या आईच्या लक्षात आली, तेव्हा तिने मुलीला याबाबत विचारले. मात्र तिने काहीच सांगितले नाही. त्यामुळे तिने शेजारच्या मैत्रिणीला मुलीशी बोलण्यास सांगितले. तेव्हा तिला या मुलीने सगळा प्रकार सांगितला आणि तिने याची तक्रार समतानगर पोलिसांकडे केली. तेव्हा पोलिसांनी तिच्या भावाला अटक करत बालसुधारगृहात पाठविले.(प्रतिनिधी)