Join us

१४व्या मजल्यावरून पडून बालकाचा मृत्यू

By admin | Updated: January 23, 2017 06:06 IST

आजीला भेटण्यास आईसमवेत नांदेडहून आलेल्या २१ महिन्यांच्या बालकाचा १४व्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडून मृत्यू झाला.

मुंबई : आजीला भेटण्यास आईसमवेत नांदेडहून आलेल्या २१ महिन्यांच्या बालकाचा १४व्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडून मृत्यू झाला. सोहम् बाळाते असे या मुलाचे नाव असून, वांद्रे बँडस्टँड येथे शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. सोहम्ची आजी येथील सी-बर्ड या इमारतीच्या १४व्या मजल्यावरील घरात राहते. त्यांची नांदेड येथे राहणारी विवाहित मुलगी सोहम्समवेत आईला भेटण्यास आली होती. शनिवारी रात्री त्या पूजा करत असताना सोहम् खेळत होता. अचानक त्याचा तोल गेल्याने तो खिडकीतून खाली पडला. त्याला भाभा रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. (प्रतिनिधी)