Join us

विविध कार्यक्रमांनी साजरा झाला बालदिन

By admin | Updated: November 14, 2014 23:14 IST

एकीकडे बालदिनाचे औचित्य साधून पालिकेने बाल स्वच्छता मोहीम हाती घेतली

ठाणो  : एकीकडे बालदिनाचे औचित्य साधून पालिकेने बाल स्वच्छता मोहीम हाती घेतली असताना आता घरातून पळून आलेल्या, अनाथ, रेल्वे फलाटांवर, रस्त्यांवर फिरणा:या मुलांना पालिकेने दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, वर्तकनगर येथे उभारण्यात आलेल्या स्नेहालयाचा शुभारंभ बालदिनाचे औचित्य साधून करण्यात आला. 
शुक्रवारी ठाणो, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतही बालदिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे विद्याथ्र्यानी गाणी, घोषणा, फलकांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्याबरोबरच स्वत: परिसर स्वच्छ केला. तसेच काही ठिकाणी सायकल रॅली, पुस्तक जत्र यासारखे विविध उपक्रमही राबविले गेले.
महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आली असून नागपूर येथे आयुक्त असताना त्यांनी ही संकल्पना पुढे आणली होती. त्यानुसार, या योजनेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. वर्तकनगर येथील लक्ष्मी पार्क परिसरात असलेल्या सुविधा भूखंडावरील चार मजली इमारतीत या मुलांना शिक्षण दिले जाणार आहे. वयाच्या 18 वर्षार्पयत पालिका या मुलांची जबाबदारी उचलणार असून त्यात त्यांचे राहणो, खाणो, शिक्षण आदींचा यात समावेश असणार आहे. पहिल्या टप्प्यात 25 मुलांना दत्तक घेतले जाणार असून टप्प्याटप्प्याने अशा अनाथ मुलांना शोधून त्यांचे संगोपन करण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले. तसेच महापालिकेच्या वतीने बाल स्वच्छता मोहिमेचाही शुभांरभ करण्यात आला. या वेळी सर्व हट्टांमध्ये बालहट्ट महत्त्वाचा असल्याने विद्याथ्र्यानी स्वच्छतेचा आपल्या वडीलधा:यांकडे आग्रह धरावा, असे आवाहन महापौर संजय मोरे यांनी केले. (प्रतिनिधी)
 
बालदिनानिमित्त 
मुलींची सायकल रॅली
मुंब्रा : मुलांप्रमाणो मुलींनादेखील समानतेची वागणूक मिळावी. खेळ, शिक्षण, सुरक्षा यामध्ये प्रगती करण्यासाठी मुलींनादेखील समान संधी मिळावी. त्यांच्यात दुजाभाव करण्यात येऊ नये, याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने तसेच सायकल चालविण्याबाबत असलेली मुलींमधील भीती दूर व्हावी, यासाठी ठामपा आणि परचम या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बालदिनाचे औचित्य साधून मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा तलाव यादरम्यान शुक्र वारी मुलींची सायकल रॅली काढण्यात आली होती. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रॅलीला ङोंडा दाखवून सुरुवात केली. तसेच सायकल चालविण्यासाठी या ठिकाणी फेरीवालेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळी केली. आयुक्त असीम गुप्ता यांनी मुलींशी हितगुज केले. संस्थेचे पदाधिकारीदेखील या वेळी उपस्थित होते.
 
बदलापूरमध्ये घरोघरी पुस्तक वाटप
बदलापूर : बदलापूरमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची 125 वी जयंती म्हणजेच बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने येथील  अॅडव्होकेट तुषार साटपे यांनी परिसरातल्या शाळेत तसेच मोहनानंदनगर परिसरात घरोघरी पुस्तकांचे वाटप केले. यात सामाजिक, थोर पुरु षांची चरित्रे, प्रवासवर्णने, ऐतिहासिक गोष्टी अशा विविध पुस्तकांचा समावेश होता. सुमारे 45क् पुस्तकांचे या वेळी वाटप करण्यात आले. बालदिनाच्या निमित्ताने विद्याथ्र्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या हेतूने मागील अनेक वर्षापासून आपण पुस्तकांचे वाटप करत असल्याचे या वेळी अॅडव्होकेट तुषार साटपे यांनी सांगितले.
 
नऊ वर्षाच्या चिमुरडीने सादर केले बाळासाहेबांचे विचार
नांदिवली : बालदिनी शाळांतून लहान मुले विविध कार्यक्रम सादर करतात. यानिमित्त गोग्रासवाडी येथील जी.एस.बी. मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणा:या नऊ वर्षाच्या  सायली संजय मांजरेकर हिने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सादर करून सर्वाची दाद मिळवली. 
बालदिनानिमित्त जी.एस.बी. मंडळ शाळेत लहान विद्याथ्र्याना तुम्हाला कोण व्हावेसे वाटते, असा विषय दिला होता. अनेक विद्याथ्र्यानी डॉक्टर,  इंजिनीअर, वकील, कलाकार होण्याबद्दल आपली स्वपAे सांगितली. 
 
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महेश तपासे, महापालिका शिक्षण मंडळाचे शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र जगदाळे, भारत पेट्रोलियम गॅस कंपनीचे अनिल शुक्ला हे प्रमुख पाहुणो म्हणून उपस्थित होते. या वेळी विद्याथ्र्यानी o्रमदान करून शाळेचा परिसर स्वच्छ केला. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा आपण वापर करणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षण यांचा गौरव करण्यात आला. तसेच काही कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. मुलांनी पंडित नेहरूंच्या जीवनावरील गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टींना उपस्थितांनी चांगली दाद देऊन कौतुक केले.
 
भातसानगर : शहापूर तालुक्यातील शाळा, सरकारी कार्यालयांमध्ये बालदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बी.के. गायकवाड, निवासी नायब तहसीलदार संदीप थोरात यांच्यासह कर्मचा:यांनी कार्यालय, कार्यालयाबाहेर स्वच्छता केली. तालुक्यातील म.ना. बरोरा माध्यमिक विद्यालय व शा.ग. काबाडी उच्च माध्यमिक विद्यालयात बालदिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. ग.वि. खाडे विद्यालयातील 2क्क् विद्याथ्र्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तहसील कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यानंतर कार्यालयातील सर्व कर्मचा:यांसमवेत हातात झाडू घेऊन कार्यालय व कार्यालयाबाहेर स्वच्छता केली.
 
नांदिवली - गद्रे बंधू व रोटरी क्लब डोंबिवली सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनानिमित्त बोडस मंगल सभागृहात तीन दिवसांची बाल पुस्तक जत्र आयोजित करण्यात आली असून चार वर्षाच्या आरष आपटे याने पुस्तक जत्रेचे उद्घाटन केले. 14 ते 17 नोव्हेंबर्पयत चालणा:या बाल पुस्तक जत्रेत सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त इंग्रजी व मराठी पुस्तके आहेत. येथील चंद्रकांत पाटकर चॅरिटेबलने बालदिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षकांनी, संस्थाचालकांनी स्वच्छता अभियानात भाग घेतला. नारायण पाटकर रोड व त्यावरील पुलावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. गणोश मंदिर ट्रस्टतर्फे शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता नेहरू मैदानात साफसफाई मोहीम आयोजित करण्यात आली आहे.