मुंबई : जिवे मारण्याची धमकी देत दुस:या इयत्तेत शिकणा:या चिमुरडीवर शाळेतील सुरक्षारक्षकानेच अत्याचार केल्याची घटना सायन-कोळीवाडा येथे घडली. अॅन्टॉप हिल पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत नराधम सुरक्षारक्षकाला गजाआड केले.
सायन-कोळीवाडा परिसरात ही सात वर्षाची चिमुरडी आई-वडील आणि आजीसोबत राहते. नुकताच झालेल्या परीक्षेत ही चिमुरडी एका विषयात नापास झाली होती. त्यासाठी शाळेकडून जादा क्लास घेतले जात होते. त्यानुसार बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही मुलगी परिसरातच असलेल्या शाळेमध्ये गेली. दीड तासानंतर क्लास संपवून ही मुलगी वर्गामध्ये जात होती. याच दरम्यान या शाळेत सुरक्षारक्षकाचे काम करणा:या मुकेश मिस्त्र (4क्) याने या मुलीला त्याच्या केबिनमध्ये नेले. या ठिकाणी तिच्यावर त्याने अत्याचार केले. तसेच ही बाब कोणाला सांगू नको, अशी धमकीही या नराधम सुरक्षारक्षकाने चिमुरडीला दिली.