Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आज नवी मुंबईत

By admin | Updated: September 25, 2015 02:37 IST

माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी एपीएमसीच्या तुर्भे येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी कामगारांचा भव्य मेळावा होणार आहे.

नवी मुंबई : माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी एपीएमसीच्या तुर्भे येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी कामगारांचा भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या प्रभावाखाली असणाऱ्या माथाडी कामगारांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रथमच हजेरी लावणार आहेत.बाळगंगा धरण घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुध्दा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाविषयी उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी सर्वसामान्य माथाडी वर्गात कमालीचा आदर आहे. माथाडींचे नेते नरेंद्र पाटील यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळाले. तर माथाडींचे दुसरे एक नेते शशिकांत शिंदे यांना थेट मंत्रिपद मिळाले होते. सत्तेत असताना राष्ट्रवादीच्या माध्यमातून माथाडींच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली आहे.