Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने प्रवास करीत मुख्यमंत्र्यांनी गाठला जिल्हा

By admin | Updated: August 2, 2014 01:22 IST

सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे आज राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई ते पालघर असा पॅसेंजर गाडीने प्रवास करीत नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन केले.

आशिष पाटील, केळवे-माहीम सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे आज राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई ते पालघर असा पॅसेंजर गाडीने प्रवास करीत नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन केले. १९५४ साली तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे रेल्वे गाडीने पालघरला आले होते. त्यानंतर सहा दशकानंतर मुख्यमंत्र्यांचे रेल्वेने पालघरला आगमन झाले.१ आॅगस्ट रोजी नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार होते, मात्र गेल्या दोन दिवसापासून पडणारा मुसळधार पाऊस, त्यामुळे नद्यांना आलेले पूर यामुळे मुख्यमंत्र्यांना हवाई मार्गाने तसेच महामार्गाने येणे शक्य नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री कसे येणार, येणार की नाही, कार्यकम वेळेत होणार की नाही अशी सर्वांनाच चिंता लागून राहिली, मात्र ती मिटली.