Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मिळाला न्याय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 04:51 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या आॅनलाइन लोकशाही दिनात सर्वसामान्यांना न्याय मिळाला. सोलापूरचे चनबसप्पा घोंगडे यांनी, तर मुख्यमंत्री साहेब तुमच्यामुळे न्याय मिळाला, अशी कृतज्ञता व्यक्त केली.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या आॅनलाइन लोकशाही दिनात सर्वसामान्यांना न्याय मिळाला. सोलापूरचे चनबसप्पा घोंगडे यांनी, तर मुख्यमंत्री साहेब तुमच्यामुळे न्याय मिळाला, अशी कृतज्ञता व्यक्त केली.घोंंगडे यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील जमीन बनावट कागदपत्रे तयार करून हडपण्याचा प्रकार घडला. जमिनीचा फेरफार रद्द केला असून उपसरपंच, ग्रामसेवकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, असे महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. त्यावर घोंगडे यांनी समाधान व्यक्त केले. वांद्रे येथील शिलू ननवाणी यांनी घराजवळील नाल्यावर बांधलेल्या अनधिकृत बांधकामाचीही दखल घेण्यात आली. कुसुंबा जिल्हा धुळे येथील ट्रॉमा केअरचे काम मार्गी लागल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबाबत गणेश सूर्यवंशी यांनी तक्रार केली होती. लोकशाही दिनी लातूर, नांदेड, पालघर, वाशीम, सिंधुदुर्ग, धुळे, रायगड, जळगाव येथील नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी झाली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस