Join us

सीसीआय येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सौरप्रणालीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 06:17 IST

चर्चगेट येथील क्रिकेट क्लब आॅफ इंडियाच्या (सीसीआय) ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलर पॅनल प्रणालीचे उद्घाटन केले.

मुंबई : चर्चगेट येथील क्रिकेट क्लब आॅफ इंडियाच्या (सीसीआय) ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलर पॅनल प्रणालीचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे क्रिकेट स्टेडियमवर साकारण्यात आलेले हे सोलर पॅनल जगातील सर्वात मोठी सौरप्रणाली ठरली आहे.

या भव्य सौरप्रणालीचे उद्घाटन केल्यानंतर फडणवीस म्हणाले की, ‘हा अत्यंत उपयुक्त प्रयोग असून अशाप्रकारचा उपक्रम प्रत्यक्षात साकार केल्याबद्दल सीसीआयचे अभिनंदन करतो. अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण जागतिक तापमानवृद्धिच्या समस्यांना समर्थपणे सामोरे जाऊ शकतो. हरित उर्जा ही आजची गरज आहे. या कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहता आले याचा आनंद असून भविष्यात अशा प्रकारच्या अधिक उपक्रमांसाठी पुढाकार घेण्यात येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.’ फडणवीस यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या सौरप्रणालीची माहिती दिली. या प्रणालीमध्ये तब्बल २२८० सौर पॅनल बसविण्यात आले असून याद्वारे दरवर्षी ८२० किलोवॅट युनिट्स (११.५ लाख) सौरौऊर्जा निर्माण करण्यात येणार आहे. शिवाय यामुळे दरवर्षी ८२५ टन कार्बन उत्सर्जनही कमी होईल अशी माहिती फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबई