Join us  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सीएसएमटी ते परळ लोकलने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 3:57 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सीएसएमटी ते परळ असा लोकलने प्रवास केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयलदेखील उपस्थित होते

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सीएसएमटी ते परळ असा लोकलने प्रवास केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयलदेखील उपस्थित होते. एल्फिन्स्टन फूटओव्हर ब्रीजच्या उद्घटनाला पोहोचण्यासाठी मुख्यमत्र्यांनी रेल्वे मंत्र्यांसोबत लोकलने प्रवास करण्याचा पर्याय निवडला. 

मुंबई उपनगरीय रेल्वेवरील आंबिवली, करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळ या पुलांचे लोकार्पण आज करण्यात येत आहे.  एल्फिन्स्टन दुर्घनेत चेंगराचेंगरीमुळे २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर एल्फिन्स्टन पाहणी दौ-यात रेल्वेमंत्री गोयल यांनी लष्करामार्फत ३ पादचारी पूल उभारण्यात येण्याची घोषणा करण्यात आली होती. लष्कराच्या बॉम्बे सॅपर्स या पूल उभारणी विभागाने बेली पद्धतीचा पादचारी पूल आंबिवली येथे, तर करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळ येथे पादचारी पूल उभारला आहे. विविध अडचणींमुळे केवळ आंबिवली स्थानकातील पादचारी पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले होते.एल्फिन्स्टन रोड स्थानकातून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने आंबविली आणि करीरोड येथील लष्करी पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसएल्फिन्स्टन स्थानक