Join us
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल

By admin | Updated: April 18, 2016 17:53 IST

महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १८ - महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुजबळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 
 
महाराष्ट्र सदन आणि इतर काही प्रकरणात घोटाळा केल्याचे भुजबळांवर आरोप आहेत. १४ मार्चला ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून भुजबळांना अटक करण्यात आली होती.