समीर कणरुक ल्ल मुंबई
गेल्या काही दिवसांत चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणात गुन्हेगारी आणि वाहतूककोंडी वाढली होती. त्यातच या परिसरातील सर्व फुटपाथ फेरीवाल्यांनी काबीज केल्याने पादचा:यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन पोलिसांनी चेंबूर रेल्वे स्थानक फेरीवालामुक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे पादचा:यांकडून आनंद व्यक्त होत असताना फेरीवाल्यांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे.
नेहमी वाहतूककोंडी असलेल्या चेंबूरमधील एन.जी. आचार्य मार्गावर काही वर्षापूर्वी 4क् ते 5क् फेरीवाले होते. मात्र सध्या या मार्गावरील फेरीवाल्यांची संख्या हजारांच्या वर गेली होती. या फेरीवाल्यांनी संपूर्ण फुटपाथवर आपली दुकाने थाटली असल्याने पादचा:यांना चालायलाही जागा शिल्लक राहिलेली नव्हती. त्यामुळे या मार्गावरून जाताना एकीकडे वाहतूककोंडी तर दुसरीकडे फेरीवाल्यांची दुकाने या सर्वामुळे पादचा:यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. पालिकेचे एम पश्चिम विभागाचे कार्यालय सोडल्यास चेंबूर रेल्वे स्थानक ते सुभाष नगर आणि चेंबूर उड्डाणपूल या ठिकाणी फेरीवाल्यांनी दुकाने थाटून संपूर्ण पदपथावर कब्जा केला होता. तर काही फेरीवाले स्टॉलसमोरच त्यांच्या मोटारसायकली अनधिकृतरीत्या पार्क करत असल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडत होती. त्यामुळे काही पादचारी आणि या फेरीवाल्यांमध्ये नेहमी या ठिकाणी वाद पाहायला मिळत होते. शिवाय गेल्या काही दिवसांत फेरीवाल्यांची दुकाने रस्त्यार्पयत पोहोचल्याने पादचा:यांसह या मार्गावर वाहनचालकांनादेखील मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
दिवसेंदिवस या मार्गावर वाढणा:या गर्दीमुळे या ठिकाणी महिलांचे मंगळसूत्र चोरणो, पाकीट मारणो आणि मारामारी अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली होता. याबाबत पालिका आणि पोलिसांना नागरिकांकडून मोठय़ा तक्रारी येत होत्या. त्यानुसार पालिकेने रस्त्यावर स्टॉल लावणा:यांवर अनेकदा कारवाया केल्या. मात्र काही तासांतच पुन्हा हे स्टॉल रस्त्यावर पाहायला मिळत होते. पोलिसांनीदेखील या फेरीवाल्यांना अनेकदा समज दिली होती. मात्र पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण होत असल्याने चेंबूर पोलिसांनी हा परिसर फेरीवालामुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2क् ऑक्टोबरपासून पोलिसांनी येथील सातशे ते आठशे फेरीवाल्यांना या परिसरातून हद्दपार केले आहे.
च्फुटपाथ काबीज केल्यानंतर काही फेरीवाल्यांनी रस्त्यांवर आपली दुकाने थाटली होती. त्यामुळे पादचा:यांसह येथील दुकानदारांना देखील याचा मोठा फटका बसत होता. फेरीवाल्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी पालिकेने दीड वर्षापूर्वी फुटपाथावर चार फूट उंच लोखंडी फेन्सिंग लावण्याचे ठरवले.
च्पहिल्यांदा फेरीवाल्यांनी हे फेन्सिंग लावण्यास पालिकेला विरोध केला. मात्र हा विरोध न जुमानता पालिकेने पोलीस बंदोबस्तात फेन्सिंग लावले. महिनाभर हे फेन्सिंग व्यवस्थित होते. मात्र काही दिवसांनंतर फेरीवाल्यांनी बाकडे लावण्यासाठी एक-एक करून सर्व फेन्सिंग गायब केले.