Join us

रिक्षात विसरलेला कॅमेरा दिला शोधून, चेंबूर पोलिसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:48 IST

त्यांनी त्वरित याबाबत चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली

मुंबई : चेंबूर स्थानक परिसरात रिक्षात विसरलेला कॅमेरा चेंबूर पोलिसांनी सहा दिवसांत शोधून दिला आहे. १४ डिसेंबरला सकाळी जगदीश वाघेला (२१) हे देवनार महापालिका शाळा येथून रिक्षाने प्रवास करून चेंबूर स्थानक येथे उतरले. काही वेळाने आपण कॅमेरा रिक्षामध्येच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी त्वरित याबाबत चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या पथकातील पोलीस हवालदार जाधव, साळुंके, पाटील, पवार, चामे यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. यामध्ये त्यांना रिक्षा क्रमांक मिळाला. त्यावरून पोलिसांनी रिक्षाचा पत्ता शोधला. शनिवारी रिक्षाचालकास चेंबूर पोलीस ठाण्यात हजर करून पोलिसांनी जगदीश यांना त्यांचा ३५ हजार किमतीचा कॅमेरा परत केला. 

टॅग्स :ठाणेऑटो रिक्षामुंबई