नवी मुंबई : घर विक्रीच्या बहाण्याने फिर्यादीची व खोटी कागदपत्रे तयार करून पतसंस्थेची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सेक्टर ४ मध्ये राहणाऱ्या प्रेसिला ज्युनियस लोबो यांनी कोपरखैरणे सेक्टर १८ मधील दिशांक सहकारी सोसायटीमधील घर जुलै २०१० मध्ये ११ महिने कराराने भाड्याने घेतले होता. सदर करार संपल्यानंतर रफिक शेख व शाहीन शेख यांच्याकडे पैसे मागितले, परंतु पैसे परत देण्यासाठी नव्हते. त्याने सदर फ्लॅट २५ लाख रुपयांना विकला. त्याविषयी १५ लाख रुपये घेवून खरेदी - विक्रीचा व्यवहार केला. यानंतर संबंधितांनी फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करून कुलस्वामिनी पतसंस्थेमधून कर्ज घेतले. यानंतर रूमचा ताबाही दिला नाही व संस्थेचे कर्जही फेडले नाही. या प्रकरणी रफिक व शाहीन शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
घर विक्रीच्या बहाण्याने फसवणूक
By admin | Updated: August 29, 2014 00:42 IST