Join us

रेल्वे प्रवाशांना स्वस्त मस्त जेवण

By सचिन लुंगसे | Updated: April 23, 2024 21:56 IST

जेवण २० रुपयांत तर न्याहारीचे जेवण ५० रुपयांत मिळणार

मुंबई: उन्हाळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे, भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या सहकार्याने अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल क्लास कोच) प्रवाशांना स्वस्त दरात अन्न आणि नाश्ता दिला जाणार आहे. त्यानुसार, परवडणारे जेवण २० रुपयांत तर न्याहारीचे जेवण ५० रुपयांत मिळणार आहे.प्लॅटफॉर्मवरील अनारक्षित डब्यांच्या (सामान्य श्रेणीचे डबे) जवळ असलेल्या काउंटरवर हे जेवण आणि पाणी उपलब्ध आहे. या काउंटरवरून प्रवासी त्यांचा नाश्ता खरेदी करू शकतात. त्यामुळे विक्रेत्यांना शोधण्याची किंवा स्टेशनबाहेर जाण्याची गरज नाही. मध्य रेल्वेवर हे फूड काउंटर इगतपुरी, कर्जत, मनमाड, खंडवा, बडनेरा आणि शेगाव, पुणे, मिरज, दौंड, साईनगर शिर्डी, नागपूर, वर्धा, सोलापूर, वाडी आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर आहेत. गेल्या वर्षी ५१ स्थानकांवर सेवेची चाचणी घेण्यात आली. चाचणीतील यशाच्या आधारावर रेल्वेने कार्यक्रमाचा विस्तार केला. आता १०० हून अधिक स्थानकांवर आणि एकूण १५० काउंटरवर आहेत.

टॅग्स :भारतीय रेल्वेमुंबई