Join us

स्वस्त फ्लॅट वरिष्ठ अधिकाऱ्याला पडला महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून माहीममध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून माहीममध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार हे पोर्ट ट्रस्ट येथे वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१८ मध्ये त्यांना एका मित्राने गिरगावातील रहिवासी शशिकांत राऊळ हा माहीममधील फ्लॅट लिलावात कमी पैशांत घेऊन देईल असे सांगितले. मित्रानेही पैसे गुंतविल्याने तक्रारदार हे सुद्धा फ्लॅट घेण्यास तयार झाले. राऊळ याने त्यांना माहीममध्ये भेटून आपण कोर्ट रिसीव्हर म्हणून काम करीत असून, डी.आर.टी. द्वारे दोन फ्लॅट कमी भावात लिलावात विकायचे असल्याचे सांगितले.

दोन्ही फ्लॅट पावणेदोन कोटी रुपयांमध्ये देण्याचा ठराव राऊळने केला. यासाठी थोडे थोडे करत तक्रारदारांनी त्याला एकूण ३३ लाख ९० हजार हजार रुपये पोहोच केले. काही दिवसांनी राऊळ नॉटरिचेबल झाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

................................