Join us

मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला चोप

By admin | Updated: July 7, 2017 06:56 IST

घरात एकटीच झोपलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या गंगाराम अखाडे (२५) या तरुणाला नातेवाइकांनी बेदम चोप

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घरात एकटीच झोपलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या गंगाराम अखाडे (२५) या तरुणाला नातेवाइकांनी बेदम चोप दिला. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घाटकोपर परिसरात तक्रारदार १३ वर्षांची मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. २ जुलै रोजी दुपारी ती घरात एकटीच झोपली असताना गंगाराम घरात आला. त्याने तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि तिला धमकावून निघून गेला. भीतीने मुलीने कुणालाही काही सांगितले नाही. मुलीच्या स्वभावातील बदलामुळे कुटुंबीयांना चिंता लागली. त्यांनी तिच्याकडे अधिक विचारणा केली असता, तिने गंगारामच्या कृत्याला वाचा फोडली. गंगारामविरुद्ध विनयभंग, पॉक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.