शेफाली परब-पंडित, मुंबईगणेशोत्सव काळात राजकीय जाहिरातबाजीवर निर्बंध आणणारे परिपत्रक पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे़ याचा फटका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आर्थिक गणिताला बसला आहेच़ मात्र विधानसभा निवडणुकीच्या बोहल्यावर चढण्यास उत्सुक राजकीय नेत्यांचे यामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे़ त्यामुळे निवडणुकीच्या काळात चमकेशगिरी सुरू राहण्यासाठी राजकीय पक्षाने प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे़ मात्र दरम्यान आचारसंहिता लागू झाल्यास हे बॅनर उतरवावेच लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.शहर विद्रूप करणाऱ्या राजकीय बॅनरबाजीवर मुंबई उच्च न्यायालयातूनच निर्बंध आल्यामुळे पालिकेचे हात मजबूत झाले़ त्यामुळे गणेशोत्सव मंडप परिसरात राजकीय जाहिरातीस मनाई करणारे परिपत्रक पालिकेच्या अनुज्ञापन विभागाने गुरुवारी जाहीर केले़ हे परिपत्रक सर्व साहाय्यक आयुक्तांना पाठवून कठोर अंमलबजावणीची सूचना केली आहे़ यामुळे छोट्या-मोठ्या गणेशोत्सव मंडळांचे बजेट हलले आहे़ मात्र जाहिरातबाजीतून मतदारांवर छाप पाडण्याच्या प्रयत्नात असलेल्या राजकीय पक्षांची पुरती कोंडी झाली आहे़गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाबाहेर लागणाऱ्या होर्डिंग्जमुळे राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असते़ या परिपत्रकाला थेट विरोध करणे शक्य नाही़ मात्र ऐन निवडणुकीत फुकटच्या प्रसिद्धीवर पाणी सोडण्यासही नेते तयार नाहीत़ त्यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या नाराजीचा आधार घेऊन आपली पोळी भाजून घेण्याचा लोकप्रतिनिधींचा प्रयत्न सुरू आहे़
चमकेशगिरीला बसणार चाप
By admin | Updated: August 26, 2014 01:50 IST
गणेशोत्सव काळात राजकीय जाहिरातबाजीवर निर्बंध आणणारे परिपत्रक पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे़ याचा फटका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आर्थिक गणिताला बसला आहे
चमकेशगिरीला बसणार चाप
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}