Join us  

मालाडच्या मढ तसेच आक्सा परिसरातील पाणीपुरवठा वेळेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:10 AM

मुंबई : मालाडच्या मढ तसेच आक्सा परिसरातील रहिवाशांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

मुंबई : मालाडच्या मढ तसेच आक्सा परिसरातील रहिवाशांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गुरुवारपासून प्रयोगिक तत्त्वावर पाण्याच्या वेळेत बदल केला आहे.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात पाण्याचा दाब हा अत्यंत कमी आहे. यामुळे पालिकेच्या पी उत्तर विभागाकडे या प्रकरणी स्थानिकांनी अनेक तक्रारी केल्या. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. तसेच या परिसरात असलेल्या अनधिकृत जलवाहिन्यांमुळे पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत नाही. परिणामी, स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी या प्रकरणी पाणी विभागातील अधिकाºयांकडे याबाबत चर्चा केली. या चर्चेत मढ आणि आक्सावासीयांचा पाण्याचा वेळ गुरुवारपासून संध्याकाळी सव्वा पाच ते साडे सात करण्यात आली आहे. तर मालवणी, खरोडी आणि राठोडीमध्ये पाणी सकाळी सात ते नऊ या वेळेस सोडले जाणार आहे. यापूर्वी या सर्वांना सव्वा पाच ते सातच्या दरम्यान पाणीपुरवठा केला जात होता.

टॅग्स :पाणीमुंबई