Join us  

महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 1:55 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर राज्यभरातून लाखो अनुयायी येणार असल्याने त्यांच्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर राज्यभरातून लाखो अनुयायी येणार असल्याने त्यांच्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबईतील महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली आहे. तसेच दादर परिसरातील सर्व फेरीवाल्यांना हटवून महत्त्वाच्या मार्गांवरील पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे.मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, न. ची. केळकर मार्ग, केळूसकर रोड, गोखले रोड, लोकमान्य टिळक उड्डाणपूल, एस. के. बोले मार्ग आणि भवानी शंकर रोडवर वाहने पार्क करण्यास बंदी घातली आहे. यात वाहतुकीसह महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून शुक्रवारी १२ वाजेपर्यंत वाहतूक बदलाचे आदेश लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.>अशी असणार वाहतूक व्यवस्थाएस. के. बोले मार्ग हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून हनुमान मंदिरापर्यंत एकदिशा करण्यात आला असून त्यापुढे वाहतुकीस बंदी आहे.भवानी शंकर रोड हा हनुमान मंदिर (कबुतरखाना) येथून जंक्शनपर्यंत एकदिशा करून गोखले रोड ते गोपीनाथ चव्हाण चौकापर्यंत बेस्ट बस आणि अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे.एस. व्ही. एस. रोड हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत बंद करण्यात आला आहे. स्थानिकांना रोड नंबर ५ , पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन ते हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत वाहने नेण्यास परवानगी देण्यात आली आहे.रानडे रोड हा वाहतुकीस बंद राहील.ज्ञानेश्वर मंदिर रोडवर सर्व वाहनांना एस. व्ही. एस. रोड जंक्शन ते दादर चौपाटीपर्यंत वाहतुकीस बंदी आहे.तसेच अनुयायांची वाढती गर्दी लक्षात घेऊन त्या वेळी दादर ट्रक टर्मिनस येथील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.बेस्ट बसेस वगळून सर्व अवजड वाहने या कालावधीत माहिम जंक्शनवरून मोरी रोड आणि सेनापती बापट मार्र्गाने वळविण्यात येणार आहेत.>शिवाजी पार्क परिसरातील वाहतूक व्यवस्था...पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कलानगर जंक्शनवरून डावे वळण घेत धारावी टी जंक्शन मार्गे सायन रेल्वे स्थानक, धारावी ६० फुटी रोड, कुंभारवाडा, सायन हॉस्पिटलनंतर उजवे वळण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग अथवा वांद्रे-वरळी सी लिंकने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुलाबा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून येणाºया वाहनांनी पी. डीमेलो मार्ग, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, झकेरीया बंदर मार्ग आणि रफी अहमद किडवाई मार्गाने माटुंगा अरोरा उड्डाणपुलापर्यंत येत उजवे वळण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, सायन हॉस्पिटल जंक्शन आणि डावे वळण घेऊन गफर खान जंक्शनवरून डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गाने वांद्रे-वरळी सी लिंक करत उपनगरामध्ये जाण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.महालक्ष्मी रेल्वे स्थानक आणि डॉ. ई. मोजेस रोडने येणाºया वाहनांनी सेनापती बापट मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.>वाहने पार्किंगसाठी परवानगी... सेनापती बापट मार्ग (दादर ते माहिम), कामगार स्टेडियम, इंडियाबुल्स फायनान्स सेंटर, वरळीतील आदर्शनगर खेळाचे मैदान, माटुंगा फाइव्ह गार्डन, माहिम रेतीबंदर, माटुंग्यातील लक्ष्मी नप्पू रोड, रफी अहमद किडवाई मार्ग, ज्युपिटर मिल कम्पाउंड आणि लोधा अपोलो मिल कम्पाउंड.>अन्नपदार्थ वाटप करणाºया वाहनांना विशेष व्यवस्था..अन्नपदार्थ वाटप करणाºया वाहनांना शिवाजी पार्कमध्ये येण्यासाठी केळूसकर मार्गावरील ५ नंबर प्रवेशद्वारातून प्रवेश देऊन राजा बढे चौक, तर माहिमसाठी दिलीप गुप्ते मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठीचे पासेस शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात देण्यात येत आहेत.>नागरिकांनी सामानाची काळजी घ्यावी...दादरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने पोलिसांनी त्यांना सामानाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.मदत कक्ष..सर्वांसाठी ठिकठिकाणी मदत कक्ष उभारण्यात आले आहेत. कुठलीही मदत लागल्यास अनुयायांनी पोलिसांकडे धाव घ्यावी, असेहीमुंबई पोलिसांनी नमूद केले आहे.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर