मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 29 आणि 3क् नोव्हेंबर रोजी बोरीवली आणि कांदिवली परिसरातील जलवाहिनीवरील गळतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेणार आहे. परिणामी याच दिवशी येथील परिसरातील पाणीपुरवठय़ात अंशत: बदल केला असून, येथील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताडकेश्वर मंदिर, गुंडेचा कंपाउंड, बोरीवली (पूर्व) येथे 12क्क् मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर गळती दुरुस्तीचे काम 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून 3क् नोव्हेंबर रोजी सकाळी 1क् वाजेर्पयत हाती घेण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठय़ाच्या वेळेत अंशत: बदल करण्यात आला आहे. आर/दक्षिण विभाग अंतर्गत कांदिवली (पूर्व) येथील दामूनगर पंचायत समिती, रहेजा संकुल, आझाद चाळ, लक्ष्मीनगर, आकुर्ली रोड, ठाकूर संकुल, जानूपाडा, बारानळ बुद्धविहाराजवळ दामूनगर या परिसरातील पाणीपुरवठय़ाची वेळ पुढे ढकलली असून, काम संपल्यावर 3क् नोव्हेंबर रोजी सदर परिसरास पाणीपुरवठा क्रमाक्रमाने करण्यात येईल. तसेच आर/मध्य विभाग अंतर्गत बोरीवली (पूर्व) येथील पश्चिम रेल्वे पूर्व भाग ते पश्चिम द्रुतगती महामार्ग बोरीवली (पूर्व) देवीपाडा, देवलापाडा, सिद्धार्थ नगर आणि कुलूपवाडी बोरीवली (पूर्व) येथील पाणीपुरवठा 3क् नोव्हेंबर रोजी नियमित वेळी परंतु कमी दाबाने होईल.
नागरिकांनी अगोदरच्या दिवशीच पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)