Join us  

मध्य रेल्वेकडून १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल; १ डिसेंबरपासून सुधारित वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 2:22 AM

मुंबई-कोल्हापूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएएसएमटी) येथून दररोज सकाळी ८.४० वाजता सुटेल.

मुंबई : मध्य रेल्वेने १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. या विशेष गाड्या १ डिसेंबरपासून सुधारित वेळ, थांब्यासह चालविण्यात येतील.

मुंबई-कोल्हापूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएएसएमटी) येथून दररोज सकाळी ८.४० वाजता सुटेल. विशेष गाडी कोल्हापूर येथून दररोज सकाळी ८.१५ वाजता सुटेल. मुंबई-सोलापूर विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज २२.४५ वाजता सुटेल. विशेष गाडी सोलापूर येथून दररोज २२.४० वाजता सुटेल. मुंबई-पुणे विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज ०५.४० वाजता सुटेल. विशेष गाडी पुणे येथून दररोज १८.३५ वाजता सुटेल. मुंबई-पुणे विशेष गाडी सीएएसएमटी येथून दररोज १७.१० वाजता सुटणार आहे. विशेष गाडी पुण्याहून रोज ७.१५ वाजता सुटेल. मुंबई-लातूर विशेष गाडी सीएएसएमटी येथून २१.०० वाजता सुटेल. विशेष गाडी लातूर येथून २२.३० वाजता सुटेल. या गाड्यांसह एकूण १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

पुणे-अजनी विशेष गाडी दर शनिवारीपुणे-अजनी विशेष गाडी दर शनिवारी पुणे येथून २२.०० वाजता सुटेल. विशेष गाडी दर रविवारी अजनीहून १९.५० वाजता सुटेल. पुणे-अमरावती विशेष गाडी दर बुधवारी पुणे येथून १५.१५ वाजता सुटेल. विशेष गाडी दर गुरुवारी अमरावतीहून १८.५० वाजता सुटेल. पुणे-अजनी विशेष गाडी दर मंगळवारी पुणे येथून १५.१५ वाजता सुटेल. विशेष गाडी दर शुक्रवारी अजनी येथून १९.५० वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पोहोचेल. तर मुंबई-आदिलाबाद गाडी सीएएसएमटीहून दररोज १६.३५ वाजता सुटेल. 

टॅग्स :लोकल