Join us

मध्य रेल्वे मार्गावरील राजधानीच्या वेळेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 06:06 IST

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस सीएसएमटीहून दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस सीएसएमटीहून दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे. हे नवीन वेळापत्रक १७ एप्रिलपासून राजधानी एक्स्प्रेसला लागू होणार आहे. या नवीन वेळामुळे राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढविला जाणार असून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.सीएसएमटी मुंबई ते हजरत निजामुद्दीन दिल्ली राजधानी एक्स्प्रेस सुरुवातीला दुपारी २.५० वाजता सुटत होती. मात्र, आता नवीन वेळापत्रकानुसार दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी सुटेल. हजरत निजामुद्दीन येथून सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी राजधानी मुंबईसाठी रवाना होईल. तर सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचेल. १ जूनपासून राजधानी एक्स्प्रेसला एक प्रथम श्रेणी वातानुकूलित डबा, ५ द्वितीय श्रेणी वातानुकूलित डबे, ११ तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे आणि एक पँट्री डबा अशी संरचना असेल.