Join us
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरात ३१ डिसेंबर रोजी वाहतुकीत बदल

By admin | Updated: December 20, 2014 01:21 IST

नवीन वर्षाचे स्वागत उपनगरवासीयांकडून करण्यात येणार असल्याने यानिमित्ताने उपनगरवासीय जुहू चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत उपनगरवासीयांकडून करण्यात येणार असल्याने यानिमित्ताने उपनगरवासीय जुहू चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जवळपास ४ ते ५ लाखांचा जनसमुदाय येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यानिमित्ताने वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ डिसेंबर रोजी दुपारी तीन ते १ जानेवारी २0१५ रोजी सकाळी पाच वाजेपर्यंत जुहू परिसरातील मार्ग एक दिशा राहणार आहेत. पुढीलप्रमाणे हे मार्ग एक दिशा असतील. जुहू रोड : एस.व्ही. रोड आणि जुहू रोड जंक्शनपासून पुढे जुहू तारा रोड जंक्शनपर्यंत पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांकरिता एक दिशा मार्ग राहील. दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांनी एसव्ही रोड दक्षिण मार्गाचा वापर करावा, असे सांगण्यात आले. जुहू रोडच्या पूर्व आणि पश्चिम मार्गावर वाहतूक पोलिसांनी ठरविलेल्या वेळेप्रमाणे वाहने पार्क करण्यास मनाई राहील. (प्रतिनिधी)