Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी परीक्षांच्या तारखांत बदल, सुधारित वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:55 IST

अंतिम वर्षाच्या परीक्षांमुळे घोळ; अखेर सुधारित वेळापत्रक जाहीर

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक (सीईटी) २१ सप्टेंबरला जाहीर झाले, परंतु राज्यात विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा १ आॅक्टोबरपासून सुरू होत असून, साधारण ३१ आॅक्टोबरपर्यंत असतील. सध्या पुनर्परीक्षार्थीच्या (बॅकलॉग) परीक्षा सुरू आहेत. याच दरम्यान परीक्षा सीईटीच्याही परीक्षा असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. प्रवेश परीक्षा द्यायची की, अंतिम वर्षाची परीक्षा, अशा पेचात विद्यार्थी असल्याने, अखेर सीईटीच्या तारखांत बदल करण्यात आला.

सीईटी, तसेच विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या काही तारखा एकाच दिवशी येत असल्याने, विद्यार्थ्यांना सीईटीच्या परीक्षांना मुकावे लागणार होते. या संदर्भातील तक्रारी विद्यार्थ्यांसह अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ प्राध्यापक संघटनेने संबंधितांकडे केल्या होत्या. त्याची दखल घेण्यात आली.नव्या वेळापत्रकानुसार काही अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या तारखांत बदल केला आहे. एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमाची सीईटी २ व ३ नोव्हेंबरला होईल. परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती व हॉल तिकीट संकेतस्थळावर उपलब्ध आहे.उच्चशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रकअभ्यासक्रम पूर्वीच्या तारखा नव्या तारखाएमपीएड ३ आॅक्टोबर (फिल्ड टेस्ट- २९ आॅक्टोबर (फिल्ड टेस्ट-४ ते ७ आॅक्टोबर) ३१ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर)एमएड ३ आॅक्टोबर ५ नोव्हेंबरबीएड/एमएड सीईटी १० आॅक्टोबर २७ आॅक्टोबरएलएलबी (पाच वर्षे) ११ आॅक्टोबर ११ आॅक्टोबरबीपीएड ११ आॅक्टोबर (फिल्ड टेस्ट- ४ नोव्हेंबर (फिल्ड टेस्ट -१२ ते १६ आॅक्टोबर) ५ ते ८ नोव्हेंबर)बीए/ बीएस्सी बीएड ११ आॅक्टोबर १८ आॅक्टोबरइंटिग्रेटेडएम-आर्च सीईटी ३ आॅक्टोबर २७ आॅक्टोबरएमएचएमसीटी ३ आॅक्टोबर २७ आॅक्टोबरएमसीए १० आॅक्टोबर २८ आॅक्टोबरबी-एचएमसीटी १० आॅक्टोबर १० आॅक्टोबर

टॅग्स :परीक्षाकोरोना वायरस बातम्या