Join us  

चक्रीवादळ ‘वायू’ने बदलली दिशा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 3:01 AM

किनारपट्टीवर धडकण्याऐवजी समुद्राच्या दिशेने वळले

अहमदाबाद / मुंबई : चक्रीवादळ ‘वायू’ गुजरातच्या किनारी भागात न धडकता ते सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरून पुन्हा समुद्राकडे वळले असून, ते ओमानच्या दिशेने निघाले आहे. मात्र परिस्थिती अद्यापही गंभीर असल्याचे मत राज्य सरकारने व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी ४८ तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

गुजरात सरकारने समुद्रकिनारी जिल्ह्यांत कच्च्या घरात राहणाºया तीन लाखांपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. तर विमानतळे बंद करण्यात आली आहेत. तसेच १00 हून अधिक रेल्वे रद्द करण्यात आल्या. राज्यात अलर्ट कायम असून शुक्रवारपर्यंत दक्षता बाळगण्यास सांगितले आहे. हे चक्रीवादळ गुुरुवारी गुजरातच्या समुद्रकिनाºयावर धडकेल, असा अंदाज होता. पण, ते वेरावलपासून १५० किमी दूर आहे. त्यामुळे हे वादळ आता किनारी भागात धडकणार नाही, तर उत्तर पश्चिम दिशेकडे जाईल. अहमदाबादच्या हवामान केंद्राच्या अतिरिक्त संचालक मनोरमा मोहंती म्हणाल्या की, या चक्रीवादळाची दिशा बदलली आहे. हे वादळ सौराष्ट्र किनारी भागात धडकणार नाही. पण, ते किनारी भागातून गिर सोमनाथ, जुनागड, पोरबंदर, देवभूमी द्वारका जिल्ह्यातून व केंद्रशासित प्रदेश दीव भागाला प्रभावित करेल. चक्रीवादळ गुजरातमध्ये प्रवेश करणार नाही. पण, वादळाचा काही भाग किनारी भागात परिणाम करु शकतो. हे चक्रीवादळ पोरबंदरपासून २१० किमी दक्षिण भागात आहे. हवामान विभागाने वायू चक्रीवादळ समुद्रातच राहील आणि गुजरातच्या किनारी भागातून पुढे जाईल, असे सांगितले. गुजरातचे अतिरिक्त मुख्य महसूल सचिव पंकज कुमार म्हणाले चक्रीवादळ अद्यापही धोकादायक आहे. किनारपट्टीवर ते परिणाम करेल. हे वादळ ९०० किमीच्या भागात पसरले आहे. सरकार आगामी ४८ तास सतर्क राहणार आहे.५६० गावांचा वीजपुरवठा खंडितचक्रीवादळामुळे गुजरातच्या ५६० गावात वीजपुरवठा खंडित झाला आहे. सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये जवळपास ५६१ फीडर लाइनवर परिणाम झाला आहे. 

टॅग्स :वायू चक्रीवादळमुंबई