मुंबई : महापालिकेच्या ‘एल’ विभागात पाणी पुरवठ्यातील तुटवड्याच्या आणि अवेळी करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी चुनाभट्टी उदंचन केंद्रातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात प्रायोगिक तत्त्वावर १५ दिवसांकरिता ८ मेपासून बदल करण्यात येणार आहे. शिवाय कुर्ला पूर्वेकडील व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी, बंटरभवन परिसर, हिंदू स्मशानभूमी रोड, पानबाझार परिसर, नेहरू नगर, स. गो. बर्वे मार्ग, कामगार नगर, रेल्वे वसाहत, शिवसृष्टी, एम-पश्चिम विभागातील भक्ती पार्क येथील पाणीपुरवठ्याच्या वेळत बदल करण्यात येत आहे. रात्री ९ ते पहाटे ३ऐवजी रात्री ९ ते पहाटे २ वाजेपर्यंत पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५ दिवसांकरिता ८ मेपासून हा बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)
पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल
By admin | Updated: May 5, 2017 04:25 IST