Join us

शिक्षण पद्धतीत बदल झाला पाहिजे -अनिल काकोडकर

By admin | Updated: October 21, 2014 04:46 IST

शिक्षण संस्थेने कसे विद्यार्थी निर्माण करावेत, याचा आदर्श म्हणून संस्थेने डॉ. लहाने यांच्यासारखे उत्तम उदाहरण आपल्या विद्यार्थ्यांपुढे ठेवले आहे

मुंबई : शिक्षण संस्थेने कसे विद्यार्थी निर्माण करावेत, याचा आदर्श म्हणून संस्थेने डॉ. लहाने यांच्यासारखे उत्तम उदाहरण आपल्या विद्यार्थ्यांपुढे ठेवले आहे. सध्याच्या शैक्षणिक पद्धतीत आमूलाग्र बदल झाला पाहिजे, शैक्षणिक संस्थांमध्ये उपक्रमशीलता गतीने जाणवली पाहिजे आणि समाजासमोर त्यांचे कार्य ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.दी एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ संस्थेच्या वतीने ‘दधीचि’ पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांना ‘दधीचि’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आपल्या मनोगतात डॉ. लहाने म्हणाले की, ‘दधीचि’ ऋषींच्या जीवनकार्याचे स्मरण करून अवयवदानाची चळवळ पुढे नेलीच पाहिजे. समाजात अनेक लोकांना दृष्टिदानाची गरज आहे. त्यामुळे शिक्षित माणसाने नेत्रदान केलेच पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी गाजर, पपई आहारात सेवन करा, असा मंत्र त्यांनी दिला. (प्रतिनिधी)