तळोजा : कळंबोलीत दोन वर्षांच्या चिमुरड्याचा घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीत पडुन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. हर्ष भोपळे (२) हा सेक्टर १५ ओंकार सोसायटी येथे राहत असून तो घराशेजारीच खेळत होता. याच सोसायटीच्या बाजूलाच रो-हाऊसचे बांधकाम सुरू होते. बांधकामासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी तेथे जमिनीत सिमेंटची पाण्याची टाकी तयार करण्यात आली होती. मात्र या टाकीवर झाकण नव्हते. घराबाहेर खेळत असताना हर्षचा टाकीत पडून मृत्यू झाला. या घटनेला रो हाऊसचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू
By admin | Updated: April 16, 2015 02:09 IST