Join us

रिपाइंचे भाजपासह संघाला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 18:32 IST

भाजपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या शाखांमध्ये महिलांना घ्यावे, असे आव्हान रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने भाजपाला दिले आहे.

मुंबई : दररोज शाळेत ‘वंदे मातरम’ म्हणण्याची सक्ती करणाºया भाजपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या शाखांमध्ये महिलांना घ्यावे, असे आव्हान रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने भाजपाला दिले आहे. रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी भारतीय जनता पार्टीसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे.खरात यांनी काढलेल्या निवेदनात वंदे मातरम म्हणण्यास विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. खरात यांच्या म्हणण्यानुसार, भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना विरोध केला जातो. त्यामुळे महिलांना मातृसंघटनेत विरोध करणाºया पक्षाला ‘वंदे मातरम्’ म्हणण्याची सक्ती करण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका त्यांनी केली आहे.