Join us

ठाण्यात एकनाथ शिंदेंना अनंत तरेंचे आव्हान

By admin | Updated: September 28, 2014 02:38 IST

शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी या मतदारसंघातून बंडखोरी न करता जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनाच कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून थेट आव्हान दिले आहे.

ठाणो : ठाणो शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने काँग्रेसमधून आयात केलेल्या रवींद्र फाटकांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी या मतदारसंघातून बंडखोरी न करता  जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनाच कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून थेट आव्हान दिले आहे. त्यांनी अखेरच्या क्षणी भाजपाकडून उमेदवारी मिळवून शिंदेंना आव्हान दिल्याने सेनेला हादरा बसला आहे. 
ठाणो शहर मतदारसंघातून नऊ  इच्छुकांमध्ये अनंत तरे यांचे नाव आघाडीवर होते. उमेदवारी न मिळाल्यास आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच, असा निर्धार त्यांनी केला होता. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ठाणो शहर मतदारसंघातून जुलैमध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या रवींद्र फाटक यांना सर्वाना अंधारात ठेवून तिकीट देण्यात आले. असे करताना कोणीही बंडाळी करू नये, हाच उद्देश होता. परंतु, पक्षात बंडाळी झालीच़ मात्र, ती ठाणो शहरात न होता तरे यांनी उमेदवारी डावल्याचे खापर एकनाथ शिंदे यांच्यावर फोडून त्यांनाच शह देण्यासाठी भाजपाबरोबर संधान साधून उमेदवारी मिळविली़ भाजपाकडून संदीप लेले यांनी शुक्रवारी एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असतानाही शनिवारी तरे यांनी अगदी भाजपाकडून दुसरा अर्ज भरला़ आश्चर्य म्हणजे त्यांनाही पक्षाने एबी फॉर्म दिला आह़े आता लेले माघार घेणार असल्याचे समजत़े (प्रतिनिधी)