मुंबई : अभिनय क्षेत्रतील करिअरमध्ये ‘इक्बाल’ चित्रपट माईलस्टोन ठरला. त्यानंतर आता ‘बाजी’ चित्रपटात सुपरहिरोची भूमिका बजावणो माङयापुढे एक आव्हानच होते. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना आगळावेगळा मराठी सुपरहिरो पाहायला मिळणार आहे, अशी आशा अभिनेता श्रेयस तळपदे याने व्यक्त केली.
‘बाजी’ या नवीन चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला त्यावेळी श्रेयस याने आपल्या भावना व्यक्त केल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन याने केले असून श्रेयस बरोबरच जितेंद्र जोशी आणि अमृता खानविलकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
यावेळी दिग्दर्शक निखिल म्हणाला,‘पुणो 52’चे दिग्दर्शन केल्यानंतर मराठीत वेगळा प्रयोग करण्याची माझी इच्छा होती. यासाठी ‘बाजी’चे कथानक मला अत्यंत योग्य वाटले. मराठीत या प्रकारचे प्रयोग झालेले नाहीत. या पाश्र्वभूूमीवर ‘बाजी’ हा वेगळा ठरेल.
(प्रतिनिधी)