Join us
Daily Top 2Weekly Top 5

वीजदरवाढीविरोधात चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 06:05 IST

कृषिपंपाच्या अन्यायी वीजदरवाढीविरोधात शासनाने सवलतीचा निर्णय घेतला नाही, तर २४ डिसेंबर रोजी कोल्हापूर ते पुणे हायवेवर ‘हायवे रोको, चक्का जाम’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने दिला आहे.

मुंबई : कृषिपंपाच्या अन्यायी वीजदरवाढीविरोधात शासनाने सवलतीचा निर्णय घेतला नाही, तर २४ डिसेंबर रोजी कोल्हापूर ते पुणे हायवेवर ‘हायवे रोको, चक्का जाम’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने दिला आहे.वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती. बैठकीत राज्यातील ४१ लाख शेतीपंपधारक वीजग्राहकांची वीजबिले १५ आॅगस्ट, २०१८ पासून दुरुस्त व अचूक करण्यात येतील. अचूक वीजबिलांच्या आधारे नवी कृषी संजीवनी योजना राबविण्यात येईल. मात्र, यापैकी कोणत्याच निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. सातत्याने पाठ पुरावा करूनही काहीच झाले नाही. परिणामी, वीजदरवाढीविरोधात चक्का जाम करण्यात येणार आहे, असे संघटनेकडून सांगण्यात आले.