मुंबई : दक्षिण-मध्य मुंबई जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस जाहिद अली शेख यांच्यावर मोटारसायकलीवरून आलेल्या तिघा जणांनी चाकूने वार करून गंभीर जखमी करण्याची घटना माटुंगा रोड स्टेशनवरील पुलावर घडली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी तिघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेख हे धारावीत राहत असून, तेथील स्थानिक नगरसेवक अहमद शेख यांच्यासमवेत काम करतात. जी /उत्तर पालिका विभागाच्या कार्यालयात कामानिमित्त दुपारी ३च्या सुमारास जात असताना स्टेशन रोडवरील उड्डाणपुलाजवळ मोटारसायकलीवरून आलेल्या तिघा गुंडांनी हा हल्ला केला.
कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर चाकूहल्ला
By admin | Updated: December 29, 2016 01:42 IST